माझी कविता

खाद्यजत्रा

मंगळवार, २ डिसेंबर, २००८

तर

मी मेघ असते तर
गर्जत आले असते
तुला पुकारात विहरतांना, तुला
चकवून गेले असते...

मी वीज असते तर
लखलखत आले असते
तेजाने स्पर्शून मी, तुला
दिपवून गेले असते...

मी वारा असते तर
घोंघावत आले असते
कधी हळवी झुळुक होऊन, तुला
शहारुन गेले असते...

पण मी धारा झाले
धो-धो बरसत आले
तुला चिंब करतांना, मी
तुझ्यातच विरून गेले...!