साहित्य:
अर्धा किलो बोनलेस चिकन
आलं पेस्ट - २ टी स्पून
लसूण पेस्ट - २ टी स्पून
हिरव्या मिरच्या - ५
कांदे - २ (मध्यम)
कोथिंबीर - चिरून २ वाट्या
पुदीना पाने - चिरून १ वाटी
४ लवंगा, ४ वेलची, ८ मिरे, २ तेजपत्रे
मीठ, तेल इत्यादी.
कृती:
१) चिकन स्वच्छ करून त्याचे क्यूब्स करून घ्यावे. त्याला मीठ, १ टी स्पून आलं पेस्ट आणि १ टी स्पून लसूण पेस्ट चोळून १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर कूकरच्या सेपरेटर मध्ये अजिबात पाणी ना घालता मंद आचेवर १ शिट्टी काढावी.
२) १ टेबल स्पून तेलावर लवंग, वेलची, मिरे घालून परतावे. त्यात उभा चिरलेला कांदा नीट परतून मिक्सर मध्ये छान पेस्ट करून घ्यावी.
३) कोथिंबीर, पुदीना व मिरचीची एकत्र पेस्ट करावी.
४) तेलावर तेजपत्ता घालून हिरवी पेस्ट घालावी. उरलेली आलं-लसूण पेस्ट घालून परतावे. कांद्याची पेस्ट घालून परतावे आणि मग चवीनुसार मीठ घालावे. २-३ मिनिटे परतून चिकनचे तुकडे घालावे. पाणी घालून एक उकळी आणावी.
५) ६-७ मिनिटे मंद गॅसवर चिकनचे तुकडे ग्रेवीमध्ये मुरु द्यावे व नंतर गॅस बंद करावा.
६) हे चिकन जरा लीपतेच असते. चपाती किंवा नान सोबत बेस्ट!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा