माझी कविता

खाद्यजत्रा

मंगळवार, २ डिसेंबर, २००८

Pepper Chicken

साहित्य: (for 2)

चिकन
फिलेट्स (बोन्लेस आणि स्किनलेस) : अर्धा किलो
दीड टेबल स्पून फ्रेश तयार केलेली मीरपूड
टेबल स्पून ओल्या नारळाची पेस्ट (वाटण करतो तशी मिक्सर मध्ये करून)
लाल तिखट (~~ टी स्पून)
धणे-जीरे पूड (प्रत्येकी टी स्पून)
हळद (/ टी स्पून)
लहान कांदे (पेस्ट करून)
टोमॅटो: अगदी छोटा टोमॅटो उकळत्या पण्यात घालून साल काढून मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यावी. मध्यम आकारचा टोमॅटो असेल तर अर्धीच पेस्ट वापरावी.
लवंगा
दालचिनी
वेलची
तेल टेबल स्पून
मीठ
आल-लसूण पेस्ट
लिम्बू (/)

कृती:

चिकन स्वच्छ करून / इंच लांबीचे तुकडे करून अर्ध्या लिंबाचा रस, मीठ आणि टी स्पून मीरपूड चोळून अर्धा तास झाकून ठेवावे. अर्ध्यातासाने ते टेबल्स्पून तेलावर पॅन मध्ये फ्राय करावे.
कढई मध्ये उरलेले टेबल स्पून तेल घालून त्यात वेलची, लवंग आणि दालचिनी फोडणीस घालावी. वरुन कान्द्याची पेस्ट घालून परतावे. आल-लसूण पेस्ट घालावी. उरलेले मसाले (हळद, तिखट आणि धणे जीरे पूड) घालावे. हे सारे परतून मग टोमॅटो पेस्ट वा नारळाची पेस्ट / वाटण आणि उरलेली अर्धा टी स्पून मीरपूड घालून परतावे. पाणी घालून उकळी आणावी. गॅस मंद करून चिकन चे तळलेले तुकडे घालावे वा एक १०मिनिटे होऊ द्यावे. छान उकळी आली की गॅस बंद करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: