माझी कविता

खाद्यजत्रा

बुधवार, ३ डिसेंबर, २००८

निर्लज्जम सदासुखी!

"हद्द झाली! खरच आता हद्द झाली!" असं प्रत्येक हल्ल्यानंतर विषण्णतेने म्हणत असतो आपण. गेल्या बुधवारच्या घटनेने फक्त मुंबईलाच नाही, भारतालाच नाही तर अख्ख्या जगाला हादरवून टाकलय. नाहक मारली गेलेली सामान्य जनता आणि लढता लढता कामी आलेले आपले वीर... त्रिवार सलाम! सलाम तर आहेच त्यांना; पण श्रद्धांजली? काय श्रद्धांजली देणार आपण त्यांना? २ मिनिटांच मौन? क्षणभराची शांतता? शांततेसाठी लढलेल्यांना? काय हवं आहे स्वतंत्र भारतीयाला? एक स्वप्न - अखंड भारताचं, एक आस आहे - सौख्याची, आणि प्रतीक्षा आहे शांततेची.
पण, धन्य आहे ही जनता, आणि धन्य आहे तो राजा, धन्य आहे त्याचा दरबार आणि दरबारी पुतळे! अफलातून विधानं करण्याची तर चढाओढच लागलीये जणू. ह्यांच्या संवेदना बधिर झाल्या आहेत की मेंदुवरचा ताबाच सुटला आहे, काही कळत नाहीए. जनतेच्या वेदना या लोकांपर्यंत पोचतच नाहीत बहुदा.
आज एक आठवडा झाला या दुर्दैवी घटनेला. देशाच्या शहरा-शहरांधून लोक रस्त्यावर उतरले आहेत - लाखोंच्या संख्येने - मनात एकच प्रश्न घेऊन. "कधी थांबवणार आहात हे सगळं? कधी उघडणार आहेत तुमचे डोळे?" खरंच, या आवाजाने तरी ही मंडळी जागी होणार आहेत का? छे! विसरलेच मी ती म्हण! "झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याचं काय?

मंगळवार, २ डिसेंबर, २००८

Pepper Chicken

साहित्य: (for 2)

चिकन
फिलेट्स (बोन्लेस आणि स्किनलेस) : अर्धा किलो
दीड टेबल स्पून फ्रेश तयार केलेली मीरपूड
३ टेबल स्पून ओल्या नारळाची पेस्ट (वाटण करतो तशी मिक्सर मध्ये करून)
लाल तिखट (~~ १ टी स्पून)
धणे-जीरे पूड (प्रत्येकी १ टी स्पून)
हळद (१/२ टी स्पून)
२ लहान कांदे (पेस्ट करून)
टोमॅटो: १ अगदी छोटा टोमॅटो उकळत्या पण्यात घालून साल काढून मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यावी. मध्यम आकारचा टोमॅटो असेल तर अर्धीच पेस्ट वापरावी.
२ लवंगा
१ दालचिनी
१ वेलची
तेल ३ टेबल स्पून
मीठ
आल-लसूण पेस्ट
लिम्बू (१/२)

कृती:

चिकन स्वच्छ करून १/२ इंच लांबीचे तुकडे करून अर्ध्या लिंबाचा रस, मीठ आणि १ टी स्पून मीरपूड चोळून अर्धा तास झाकून ठेवावे. अर्ध्यातासाने ते १ टेबल्स्पून तेलावर पॅन मध्ये फ्राय करावे.
कढई मध्ये उरलेले २ टेबल स्पून तेल घालून त्यात वेलची, लवंग आणि दालचिनी फोडणीस घालावी. वरुन कान्द्याची पेस्ट घालून परतावे. आल-लसूण पेस्ट घालावी. उरलेले मसाले (हळद, तिखट आणि धणे जीरे पूड) घालावे. हे सारे परतून मग टोमॅटो पेस्ट वा नारळाची पेस्ट / वाटण आणि उरलेली अर्धा टी स्पून मीरपूड घालून परतावे. पाणी घालून उकळी आणावी. गॅस मंद करून चिकन चे तळलेले तुकडे घालावे वा एक १०मिनिटे होऊ द्यावे. छान उकळी आली की गॅस बंद करावा.